Home Cities जळगाव मागणी करणे शिवसेनेचे काम…मात्र दोन्ही जागा भाजपच लढविणार-ना. महाजन (व्हिडीओ)

मागणी करणे शिवसेनेचे काम…मात्र दोन्ही जागा भाजपच लढविणार-ना. महाजन (व्हिडीओ)

0
33

जळगाव प्रतिनिधी । जागेची मागणी करणे हे शिवसेनेचे काम असले तरी जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा भाजपच लढविणार असल्याचे ठाम प्रतिपादन आज जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन यांनी केले.

शिवसेना व भाजपमध्ये युती झाली तरी दोन्ही पक्षांच्या नेत्यांमधील बेबनाव अद्याप कमी होण्यास वेळ लागणार असल्याचे आधीच स्पष्ट झाले आहे. युतीची घोषणा होण्याआधीच सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी जळगाव लोकसभा मतदारसंघ शिवसेनेला मिळण्याची मागणी केली होती. याबाबत आज जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, जागेची मागणी करणे हे शिवसेनेचे कामच आहे. मात्र जिल्ह्यातील दोन्ही जागा भाजपच लढविणार असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. याप्रसंगी आमदार राजूमामा भोळे, आमचार चंदूलाल पटेल, महापौर सीमाताई भोळे तसेच भाजपचे जळगाव लोकसभा मतदारसंघातील संभाव्य उमेदवार अभियंता प्रकाश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

पहा- ना. गिरीश महाजन नेमके काय म्हणाले ते !


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound