धरणगाव, प्रतिनिधी । शहरात रासायनिक खत यूरिया,(10.26.26),(15.15.15) व इतर मिश्र खत शेतकऱ्यांना उपलब्ध होत नाही. यावर्षी वेळेवर पाऊस पड़ून सुद्धा पिकांना खत न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. व्यापाऱ्यांनी केलेल्या साठेबाजारीमुळे शेतकऱ्यांना यूरिया चढ्या दराने खरेदी करावा लागत असून खताचा कृत्रिम तुटवडा निर्माणकरून काळा बाजाराविरोधात भाजपा आंदोलन करेल असा इशारा तालुका अध्यक्ष अँड़ सजंय महाजन यांनी दिला आहे.
भाजपा तालुका अध्यक्ष अँड़ सजंय महाजन यांनी पुढे म्हटले आहे की, साठेबाज व्यापारी व अधिकारी वर्ग यांची मिलीभगत व गचाळ काराभारामुळे शेतकऱ्यांचे हाल होऊन,यूरिया चढ्या दराने खरेदी करावी लागत आहे. मागील महायुती सरकारच्या कार्यकाळात पाच वर्षात एकही वर्ष खताचा तुटवडा जाणवला नाही. (आता पाणी कुठ मूरतय)त्यामुळे सर्व अधिकारी वर्ग यांना सूचित करण्यात येते की जर दोन दिवसाच्या आत यूरिया व इतर मिश्र खत धरणगावात उपलब्ध झाले नाही तर भारतीय जनता पार्टी कुठल्याही कायद्याची पर्वा न करता तीव्र स्वरूपाचे जनआंदोलन करेल व होणाऱ्या नुकसानीस शासन व खताचा कृत्रिम तुटवडा निर्माण करणारे अधिकारी व व्यापारी जवाबदार राहतील असा इशारा दिला आहे.