जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौरांची निवड झाली त्यावेळेस भारतीय जनता पक्षाचे २७ नगरसेवक तुटून त्यांनी विरोधी पक्षाला मतदान केल्याची घटना घडली होती. याबाबत भाजपचे गटनेते यांनी आणि भाजप बंडखोर गटानेही भाजप विरूध्द याचिका दाखल केली असून १० मे रोजी नाशिक विभागीय आयुक्ताकडे दाव्याची सुनावणी होणार आहे.

याबाबत दोन्ही गटाच्या नगरसेवकांना नोटीस बजावण्यात आली आहे. यासंदर्भात भाजपचे गटनेते भगत बालाणी यांनी बंडखोर नगरसेवकावर कारवाई करावी यासाठी विभागीय आयुक्तांकडे याचिका दाखल केली आहे. तर भाजप बंडखोर गटानेही भाजप विरूध्द याचिका दाखल केली आहे.
यात त्यांनी म्हटले आहे की, “आम्हीच मूळ भाजप असून आम्ही मतदानाचा व्हीप बजावला तो भाजपच्या नगरसेवकांनी नाकाराला त्यामुळे त्यांना अपात्र करावे. गटनेते ॲड दिलीप पोकळे यांनी ही याचिका दाखल केलीआहे. या प्रकरणी मूळ भाजप नगरसेवकांना नोटीस बजावण्यात आली आहे. दोन्ही गटाची सुनावणी १० मे रोजी सकाळी अकरा वाजता नियोजन भवनात नाशिक विभागिय आयुक्त यांच्या समोर सुनावणी होणार आहे. दोन्ही गटांना आमने सामने बसवून सुनावणी होणार आहे.