सोलापूर (वृत्तसंस्था) वंचित बहुजन आघाडीच्या चिन्हासमोरील बटण दाबले, तरी कमळालाच मतदान जात असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांचे पुत्र सुजात आंबेडकर यांनी केला आहे. दरम्यान, तक्रार मिळताच जिल्हाधिकाऱ्यांनी मशीन सील केल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी दिली आहे. दरम्यान, सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मात्र प्रकाश आंबेडकर यांचे आरोप फेटाळून लावले आहेत.
यावेळी प्रकाश आंबेडकर यांनीही ईव्हीएमवर आरोप करत वंचित बहुजन आघाडीच्या चिन्हासमोरील बटण दाबल्यास कमळाला मत जात असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी आज सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराज मंदिरात हजेरी लावली. तर मुस्लिम समाजातील प्रसिद्ध शाहहुजूरअली दर्ग्यालाही भेट दिली. यावेळी बसप नगरसेवक आनंद चंदनशिवेही उपस्थित होते. दरम्यान, सकाळी 11 वाजेपर्यंत सोलापुरात 19 टक्के मतदान झालेले होते.
Try to speak about constitution. And by that only all peoples r gets there rights . This must we tell and explain to all.