परभणीत पोलिसांच्या गाडीवर दगडफेक ; परिसरात तणावाचे वातावरण

paranipar2

 

परभणी (वृत्तसंस्था) आज सकाळी परभणी जिल्ह्यातील शिवडीत येथील एका मतदान केंद्रावर पोलिसांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. दगडफेकीच्या घटनेमुळे काही काळ मतदान प्रक्रियेवर परिणाम झाला होता. परंतु, थोड्याच वेळात मतदान प्रक्रिया पुन्हा सुरळीत सुरू करण्यात पोलिसांना यश आले आहे.

 

लोकसभा निवडणूक २०१९ च्या दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील बुलडाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर या १० मतदारसंघात मतदान सुरू आहे. या दरम्यान परभणीतील मानवत तालुक्यात शिवडी येथील मतदान केंद्रवार मतदान प्रक्रिया सुरू असताना पोलिसांनी शंभर मीटर हद्दीत सुरू असलेले किराणा दुकान कारवाई करत बंद केले. यामुळे वाद सुरू झाला आणि थोड्याच वेळात या वादाचे रुपांतर दगडफेकीत झाले. यानंतर तणावाचे वातावरण तयार झाले होते.

Add Comment

Protected Content