धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भाजप जळगाव पश्चीम जिल्हा कार्यकारिणीची रखडलेली कार्यकारिणी पक्षाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांनी जाहीर केली आहे.
अलीकडेच भारतीय जनता पक्षाने दोन ग्रामीण जिल्हाध्यक्ष व महानगराध्यक्षांची नियुक्ती केली होती. यानंतर स्थानिक कार्यकारण्याची नियुक्ती नेमकी केव्हा होणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. अनेकदा यादी येणार असल्याची चर्चा होत असली तरी कार्यकारिणी जाहीर झाली नव्हती. या अनुषंगाने काल रात्री उशीरा पक्षाची जळगाव महानगर आणि जळगाव पश्चीम जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
या नवीन कार्यकारिणीत नऊ जिल्हा उपाध्यक्ष, चार सरचिटणीस, ११ चिटणीस आणि एक कोषाध्यक्ष यांचा समावेश आहे. यात जळगावातून रोहित निकम, जळगाव ग्रामीणमधून गोपाळ भंगाळे, धरणगावातून संजय महाजन, चाळीसगावातून संजय पाटील, भडगावातून सौ. नूतन पाटील, पाचोर्यातून मधुकर काटे, व प्रदीप पाटील, एरंडोलमधून भिका कोळी, अमळनेरमधून बाळासाहेब पाटील यांची जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे.
यासोबत सरचिटणीसपदी एरंडोल येथील सचिन पानपाटील, पारोळा येथील रेखाताई चौधरी, अमळनेर येथील भिकेश पाटील, चाळीसगाव येथील धनंजय मांडोळे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
दरम्यान, चिटणीसपदी जळगाव ग्रामीणचे मनोहर भास्कर पाटील, चाळीसगावचे प्रशांत पालवे, पाचोरा येथील प्रमोद सोमवंशी, धरणगाव येथील प्रमीला मधुकर रोकडे, चाळीसगावचे विवेक चौधरी, भडगावचे प्रमोद पाटील, पाचोरा येथील ज्योती निलेश चौधरी, एरंडोल येथील निलेश परदेशी, अमळनेर येथील मीनाताई पाटील, पारोळा येथील महेश पाटील व पारोळा येथीलच नाना सुकदेव पाटील यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर कोषाध्यक्षपदी पाचोरा येथील कांतीलाल जैन यांची नियुक्ती झाली आहे.
पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशाने, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन, प्रदेश महामंत्री विजय चौधरी, प्रदेश प्रभारी रवी अनासपुणे आणि जळगाव जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांच्या सूचनेनुसार ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.