अमळनेर (प्रतिनिधी) जळगाव जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतरांचे अनेक प्रश्न आज मार्गी लागले. भाजपा प्रदेश शिक्षक आघाडीची जळगाव जिल्हा शिक्षणाधिकारी यांच्यासोबत जिल्हा परिषद कार्यालयात सहविचार सभा आयोजित करण्यात आली होती.
भाजपा शिक्षक आघाडी जळगाव जिल्ह्याचे अध्यक्ष महेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व जळगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार सुरेश (राजू मामा) भोळे तसेच भाजपा प्रदेश शिक्षक आघाडीचे कोकण व मुंबई विभाग अध्यक्ष अनिल बोरनारे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्ह्यातील अनके प्रश्नांबाबत चर्चा करण्यात आली. याप्रसंगी नाशिक विभाग संयोजक महेश मुळे, सहसंयोजक प्र.ह.दलाल, जळगाव जिल्ह्याचे सरचिटणीस मनोहर तेजवानी व अतुल पाटील, उपाध्यक्ष प्रमोद जाधव व नरेंद्र पालवे, धुळे शहर संयोजक आनंद पाटील, सहसंयोजक मनोहर चौधरी, माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डी. पी. महाजन, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी बी. जे. पाटील, शिक्षणाधिकारी कार्यालयातील अधिकारी व जिल्ह्यातील भाजपा प्रदेश शिक्षक आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जळगाव जिल्ह्यातील शाळांमधील आरटीई मान्यता त्वरित देणे, वेतनेतर अनुदानाचे वितरण करणे, पीएफ निधी वितरण, सेवानिवृत्त शिक्षकांच्या वेतनाचे प्रलंबित प्रकरणे, वैद्यकीय प्रतिपूर्ती तातडीने देण्याबाबत चर्चा करण्यात आली. शिक्षकांना सेवाजेष्ठता यादी व दुय्यम सेवापुस्तके देण्याचे स्वतंत्र आदेश काढण्यात येतील असेही शिक्षणाधिकाऱ्यांनी मान्य केले. प्रलंबित शालार्थ आयडी मिळण्याबाबत पाठपुरावा व विद्यार्थ्यांच्या विविध शिष्यवृत्तीचे वाटप तातडीने करण्यात येईल असेही या सभेत ठरले.