भाजपाने आश्वासन पुर्ण करावे; कोळी समाजाची मागणी

yawal news 1

यावल प्रतिनिधी। शासनाने कोळी समाज बांधवाना टोकरे कोळी जातीचे वैधता प्रमाणपत्र द्यावे व विधानसभा निवडणुक अगोदर दिलेले आश्वासन भाजपा सरकार पाळावे, अशी मागणी कोळी समाजाचे नेते सुभाष सोनवणे यांच्या नेतुत्वाखाली आ. एकनाथराव खडसे यांना निवेदन दिले.

यापुर्वी जळगाव जिल्हातील सर्वं सन्मानिय खासदार सन्मानिय आमदार यांची भेट घेऊन कोळी समाज बांधवाना टोकरे कोळी जातीचे प्रमाणपत्र मिळावे. यासाठी नुकतीच रावेर यावल मतदार संघाचे ना. हरिभाऊ जावळे यांची भेट घेतली होती व आज सकाळी ९ वाजता माजी महसुल मंत्री आ. एकनाथराव खडसे व रावेर लोकसभा मतदार संघातील खासदार रक्षाताई खडसे यांची मुक्ताईनगर येथेत्यांच्या निवासस्थानी कोळी समाजाच्या शिष्टमंडळाने भेट घेतली.

याप्रसंगी अंजाळे सरपंचपती तथा सामाजिक कार्यकर्ते कैलास सपकाळे कठोरा येथील सामाजिक कार्यकर्ते भगवान कोळी, अंजाळे उपसरपंच धनराज सपकाळे, अंजाळे येथील ग्रा.पं.सदस्य योगेश सांळुखे, पाडळसे ग्रा.पं.सदस्य ज्ञानेश्वर तायडे, रिधोरी ता. यावल येथील सामाजिक कार्यकर्ता संदीप सोनवणे, मुकेश सोनवणे यांच्यासह भालशिव पिप्री, बोरावल, राजोरा, माय, सांगवी, राजोरा, अट्रावल, रिधोरी, वढोदा, कंरजी, वनोली, भोरटेक, दुसखेडा, पाडळसे व जिल्ह्यातील कोळी समाज बांधव मोठया संख्येत उपस्थित होते.

Protected Content