Home Cities जळगाव भाजपाने ‘महायुती’ धर्म पाळावा; निवडणूकीत रिपाइंला जागा सोडण्याची मागणी !

भाजपाने ‘महायुती’ धर्म पाळावा; निवडणूकीत रिपाइंला जागा सोडण्याची मागणी !

0
106

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असतानाच, महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये रिपाइंने भाजपासोबत खांद्याला खांदा लावून काम केले आहे, त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत भाजपने रिपाइंला सन्मानजनक जागा सोडाव्यात, अशी मागणी रिपाइंचे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल यांनी केली आहे.

‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’शी संवाद साधताना अडकमोल यांनी महायुतीच्या भूमिकेवर जोर दिला. ते म्हणाले, “आम्ही महायुतीचे एकनिष्ठ घटक पक्ष आहोत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आम्ही भाजपला पूर्णपणे सहकार्य केले आणि त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला. जळगाव शहरातही आमची ताकद चांगली आहे.”

शहरातील विशिष्ट प्रभागांमध्ये रिपाइंचे मजबूत संघटन आणि निर्णायक मतदार आहेत. या पार्श्वभूमीवर, महापालिका निवडणुकीत भाजप नेतृत्वाने मित्रपक्षाचा विचार करून रिपाइंसाठी काही जागा आरक्षित कराव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. भाजपने रिपाइंला योग्य वाटा दिल्यास, महायुती एकत्रितपणे ही निवडणूक अधिक ताकदीने लढवू शकेल आणि महापालिकेत पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी मदत होईल, असा विश्वास अडकमोल यांनी व्यक्त केला. रिपाइंने जागावाटपासाठी जोरदार मागणी केल्यामुळे आता भाजप नेतृत्व या मागणीवर काय निर्णय घेते, याकडे सर्व राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.


Protected Content

Play sound