मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करण्यासाठी अनेक नेत्यांची रांग लागली आहे. आता माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी आज शरद पवार यांची भेट घेऊन तुतारी हाती घेण्याची घोषणा केली.
लक्ष्मण ढोबळे हे सोलापूरचे माजी पालकमंत्री आहेत. शरद पवार यांचे ते सुरुवातीपासूनचे सहकारी होते. २०१९ च्या निवडणुकीच्या आधी ते राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेले होते. आता ते परत राष्ट्रवादीत आले आहे.
लक्ष्मण ढोबळे यांचे चिरंजीव अभिजित ढोबळे हे मोहोळ विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. मात्र, तिथे अजित पवारांच्या पक्षाचा विद्यमान आमदार आहे. अजित पवार हे महायुतीत असल्याने आता तिथे ढोबळे यांना उमेदवारी मिळणे अवघड आहे. हे लक्षात आल्याने ढोबळे यांनी पवारांची साथ देण्याचा निर्णय घेतला आहे.