जळगाव प्रतिनिधी । भाजपच्या शक्ती केंद्र प्रमुखांचे संमेलन रविवारी भुसावळ रस्त्यावरील अटल नगर येथे आयोजित करण्यात आले आहे.
या संमेलनात भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू व रामदास आंबटकर यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभणार आहे. तसेच याप्रसंगी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पर्यटन व रोजगार हमी योजना मंत्री जयकुमार रावल, माजी मंत्री एकनाथराव खडसे, खासदार ए. टी. पाटील, खासदार हिना गावित, खासदार रक्षा खडसे, विभाग संघटन मंत्री किशोर काळकर यांच्यासह पक्षाचे आमदार, प्रदेश पदाधिकारी, प्रदेश कार्यकारणी सदस्य, नगरसेवक, जिल्हा पदाधिकारी, जिल्हा कार्यकारिणी, मंडल अध्यक्ष व सरचिटणीस, जिल्हा आघाडी अध्यक्ष, लोकसभा व विधानसभा विस्तारक, शक्तीकेंद्र प्रमुख, लोकसभा संयोजन समिती आदी उपस्थित राहणार आहेत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर, हे संमेलन अतिशय महत्वपूर्ण मानले जात आहे.