Home राजकीय पश्चिम महाराष्ट्रात भाजपला धक्का : ‘या’ नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश

पश्चिम महाराष्ट्रात भाजपला धक्का : ‘या’ नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश

0
29

सांगली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पश्चिम महाराष्ट्रात भाजपला धक्का बसला असून पक्षाच्या एका मातब्बर नेत्याने आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

माजी मंत्री आणि शिराळा विधानसभा मतदारसंघातील भाजपचे नेते शिवाजीराव नाईक यांनी आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार श्रीनिवास पाटील यांचीही या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती.

2019 च्या निवडणुकीत शिराळा मतदारसंघात शिवाजीराव नाईक यांचा पराभव झाला होता. या निवडणुकीत नाईक यांना ७६,००२ इतकी म्हणजे ३३ टक्के मते पडली होती. चंद्रकांत पाटील यांच्यामुळेच शिराळ्यात आपला हा पराभव झाल्याचा आरोप शिवाजीराव नाईक यांनी केला होता. भाजप प्रदेशाध्यक्षांचं धोरण हे एकाला जवळ करायचं आणि दुसऱ्याला त्रास देत खेळ्या करत राहायचं, असं असल्याचा आरोप त्यांनी केला होता.

नाईक यांनी असंही म्हटलं होतं की कोल्हापूर जिल्ह्यात चंद्रकांत पाटलांचा वेगळा हेतू आहे, मात्र त्याचा परिणाम आम्हाला इथे सहन करावा लागला. वेगळ्या खेळ्या करून त्यांनी हेतू पुरस्कर भाजप कार्यकर्त्यावर अन्याय केला. त्यांच्याकडून ज्या पद्धतीची वागणूक हवी होती, ती मिळाली नाही. त्यामुळे आम्ही राजीनामा देत आहोत. नाईक यांच्या प्रवेशामुळे सांगलीत राष्ट्रवादी भक्कम होणार आहे.

 


Protected Content

Play sound