Home राजकीय भाजपने शिवसेनेला देऊ केल्या अवघ्या १२० जागा

भाजपने शिवसेनेला देऊ केल्या अवघ्या १२० जागा

0
31


मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेनेशी युती करण्यासाठी भाजपने निम्म्या-निम्म्या जागांची मागणी अमान्य केली आहे. नवीन प्रस्तावानुसार भाजपने शिवसेनेला १२० जागा देऊ केल्या आहेत. तर स्वत: १५६ जागा लढवण्याचा निर्णय घेतला असून उर्वरीत १२ जागा मित्र पक्षांना सोडण्याची तयारी दर्शवली आहे.

 

शिवसेनेने निम्म्या जागांची मागणी केली आहे. मात्र, सध्या १२२ जागी भाजपचे आमदार आहेत. त्यामुळे ही मागणी भाजपला मान्य नाही. शिवसेनेने १२० जागा लढवाव्यात, मित्र पक्षांना १२ जागा द्याव्यात व स्वत:कडे १५६ जागा ठेवाव्यात, असा नवीन प्रस्ताव भाजपने तयार केला आहे. तसेच हा प्रस्ताव शिवसेनेला देण्यात आला आहे.


Protected Content

Play sound