Home धर्म-समाज भाजप खासदारांनी मारला संसद परिसरात झाडू

भाजप खासदारांनी मारला संसद परिसरात झाडू

70202869
70202869

70202869

नवी दिल्ली, वृत्तसंस्था | लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी संसद परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. भाजपचे अनेक मंत्री आणि खासदार या मोहिमेत सहभागी झाले होते. भाजप खासदार हेमा मालिनी आणि केंद्रीय राज्य मंत्री अनुराग ठाकूर यांनी स्वतः हातात झाडू घेऊन साफसफाई केली.

 

स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशभरात स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. भाजप नेते, खासदार, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आणि सर्वसामान्यांचाही या मोहिमेत मोठा सहभाग असतो. संसद परिसरातही शनिवारी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या मोहिमेचे नेतृत्व केले. भाजपचे मंत्री आणि खासदारांनी हातात झाडू घेऊन संसद परिसर स्वच्छ केला.


Protected Content

Play sound