जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहर विधानसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार राजूमामा भोळे हे आपला उमेदवारी अर्ज आज दुपारी १२ वाजता दाखल करणार असल्याने शिंपी समजाच्या वतीने अर्ज भरण्यासाठी उपस्थित राहण्याचा निर्णय शिंपी समाजाच्या बैठकीत घेण्यात आला..
यावेळी शिंपी समाजाचे बुधवारी शिंपी समाजाची कार्यकारिणी बैठक घेण्यात आली. यावेळी भाजपाचे उमेदवार राजूमामा भोळे यांना शिंपी समाजाचा जाहिर पाठींबा दिला आहे. आज दुपारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून शहरात शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. यावेळी या मिरवणूकीत सर्व शिंपी समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन अखिल भारतीय शिंपी समाज युवाध्यक्ष व भाजपा जिल्हा प्रसिध्दी प्रमुख मनोज भंडारकर यांनी केले आहे.