भाजपा आमदार आशिष शेलारांना धमकीचे फोन, मुंब्रातून दोघांना अटक

मुंबई । भाजपाचे आमदार आशिष शेलार यांना काल (सोमवारी) अनेकवेळा धमकीचे फोन येत होते. या प्रकरणी मुंब्रा येथून दोन संशयितांना अटक करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

दरम्यान, मागील महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख यांसह शिवसेना खासदार संजय राऊत यांना दुबईहून धमकीचे फोन आले होते. सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यानंतर आता विरोधी पक्षातील बड्या नेत्याला धमकीचे फोन आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

ठाकरे सरकारला नेहमीच अंगावर घेणाऱ्या आशिष शेलारांनी नेहमीप्रमाणे आम्हाला हिंदुत्वाच्या प्रमाणपत्राची गरज नसल्याचं शिवसेनेला ठणकावून सांगितलं आहे. होय, आज तुमच्या हिंदुत्वाची भेसळ झाल्याने तुम्हाला प्रमाणपत्राची खरी गरज आहे, असे प्रत्युत्तर आमदार ॲड. आशिष शेलार यांनी दिले आहे. आमदार ॲड आशिष शेलार यांनी म्हटले आहे की, मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे महोदय, आपल्याला आज खरंच हिंदुत्वाचे प्रमाणपत्र घेण्याची वेळ आलेली आहे. याचे कारण हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वापासून तुम्ही केव्हाच फारकत घेतली आहे. प्रतारणा केली आहे. तुम्हाला हे नाकारता येणार नाही, या मुंबईवर आणि भारतावर हल्ला करणाऱ्या याकुबला फाशी झाली, त्यावेळी त्याच्या फाशीला विरोध करणाऱ्यांना तुम्ही तुमच्या मंत्रिमंडळात घेतले आहे.

 

Protected Content