मुंबई (वृत्तसंस्था) गोपीनाथ गडावर उद्या, १२ डिसेंबरला पंकजा मुंडे यांच्यासह या कार्यक्रमाला विनोद तावडे, राज पुरोहित, प्रकाश मेहता हे भाजपातील नाराज नेते उपस्थित राहणार आहेत. यानिमित्ताने भाजपमध्ये मोठी फूट पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
एकनाथराव खडसे यांनी मंगळवारी पंकजा मुंडे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर खडसेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ४० मिनिटे विधानभवनात भेट घेतली. यानंतर खडसे यांनी आपण गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकासाठी औरंगाबाद येथे जमीन दिली होती. मात्र ते स्मारक गेल्या पाच वर्षांत होऊ शकलेले नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मी या स्मारकाचे काम लवकरात लवकर सुरू करावे. तसेच माझ्या मतदारसंघात केंद्राचे दोन सिंचन प्रकल्प येत असून त्याचीही विनंती आपण मुख्यमंत्री ठाकरे यांना केल्याचे त्यांनी सांगितले. गोपीनाथ गडावर विनोद तावडे, राज पुरोहित, प्रकाश मेहता हे तिघे येणार असल्याचे त्यांचे विधान खूप बोलके आहे. या तिन्ही नेत्यांचे तिकीट देवेंद्र फडणवीस यांनी कापले होते. हे तिन्ही नेते व खडसे आणि पंकजा मुंडे असे जर गोपीनाथ गडावर एकत्र आले तर खूप मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता असल्याचे भाजपमधील नेत्यांना वाटते आहे.