मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | एकीकडे विधानपरिषद निवडणुकीसाठी वेगवान घडामोडी होत असतांना राष्ट्रवादीचे मुख्य प्रतोद तथा अमळनेचे आमदार अनिल भाईदास पाटील यांनी भाजप नेते विजयाचे स्वप्न पाहत असल्याचे सांगत जोरदार टीकास्त्र सोडले आहे.
विधानपरिषद निवडणुकीसाठीच्या हालचाली आता शेवटच्या पण निर्यायक टप्प्यात आलेल्या आहेत. या पार्श्वभूमिवर, प्रत्येक पक्षाचे नेते प्रसारमाध्यमांशी संवाद साधतांना दिसून येत आहेत. राष्ट्रवादीचे मुख्य प्रतोद तथा अमळनेरचे आमदार अनिल भाईदास पाटील यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलतांना मविआच्या सर्व आमदारांचा विजय होणार असल्याचा आशावाद व्यक्त केला.
ते म्हणाले की, राज्यसभेतील चूक आता होणार नसून आमचे सर्वच्या सर्व उमेदवार निवडून येणार आहेत. आपला पराभव दिसून येत असल्यामुळे भाजपचे नेते आता काहीही दावे करत आहेत. मात्र त्यांचे स्वप्न हे काही पूर्ण होणार नसून त्यांना पराभवाचा धक्का बसणार असल्याचेही अनिल पाटील म्हणाले.