जळगाव प्रतिनिधी । भारतीय जनता पक्षाचे नेते तथा माजी खासदार निलेश राणे हे आज जळगावात येत असून त्यांच्या उपस्थितीत मराठा आरक्षणाबाबत बैठक होणार आहे.
भारतीय जनता पक्षाचे पक्षातील मान्यवर मराठा नेत्यांना राज्यभरात जाऊन मराठा आरक्षणाबाबत ते ठिकठिकाणी पत्रकार परिषदांमधून माहिती देणार आहेत. या अनुषंगाने आज माजी खासदार निलेश राणे हे जळगाव जिल्हा दौर्यावर येत आहेत. ते आज सायंकाळी भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन आरक्षणाबाबत आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट करणार आहेत. याप्रसंगी पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्यासह नेते व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
यासोबत माजी खासदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत मराठा समाजातील मान्यवरांच्या बैठकीचे आयोजन देखील करण्यात आले आहे. यात आरक्षणाबाबत पुढील लढ्याबाबत ते सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत. राणे कुटुंब हे शिवसेना आणि त्यातही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, संजय राऊत यांच्या विरूध्द नेहमी आक्रमक भूमिका घेत असतात. या पार्श्वभूमिवर, निलेश राणे आज जळगावात त्यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडण्याची शक्यता आहे.