यावल प्रतिनिधी । भारतीय जनता पक्ष किसान मोर्चाच्या वतीने उद्या (दि.१५फेब्रुवारी) रोजी सावदा येथील उप विभागीय महावितरण कार्यालय अधिकारी यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांसह वीज ग्राहक समस्यांविषयी निवेदन देण्यात येणार आहे.
दरम्यान भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चा व यावल तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने काढण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, महावितरणच्या वतीने शेतकऱ्यांना कोणतीही पुर्व सुचना न देता त्यांचे शेतीचे विज कनेक्शन तोडण्यात येत आहे. या संदर्भात महावितरणने म्हटले होते, आम्ही विजबिल वरील इतर आकार व व्याज माफ करून थकलेले वीजबिल भरण्यासाठी शेतकऱ्यांना सवलत देवु असे सांगीतले होते. जाहीर केलेले वरील पैकी कोणतीही बाब लक्षात न घेता निम्मे वीजबिल भरण्यासाठी शेतकऱ्यांना तगादा लावला जात आहे. महावितरण विभागाकडुन कुठलीही पुर्व सुचना न देता संपुर्ण डीपी बंद करून शेतकऱ्यांना नाहक त्रास दिला जातोय. अशाच प्रकारे विजवितरण विभागाकडुन पुर्व सुचना न देता घरगुती वीज कनेक्शन खंडीत करून विज ग्राहकांना त्रास दिला जात आहे. ही सर्व शेतकऱ्यांची आहे. त्यांना जाणुन बुजुन त्रास देणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील महाविकास आघाडी शासनाच्या विरूद्ध शांतता मार्गाने शेतकऱ्यांना सोबत घेवुन निवेदन देणार आहे.
या निवेदनावर राज्यातील महाविकास आघाडी शासनाने निर्णय न घेतल्यास शेतकऱ्यांना दिलासा न दिल्यास भारतीय जनता पार्टी रस्त्यावर उतरून मोठे तीव्र स्वरूपात आंदोलन करेल असा ईशारा देण्यात आला आहे. दि.१५ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता भारतीय जनता पक्ष, किसान मोर्चा उत्तर महाराष्ट्र विभाग प्रमुख सुरेश धनके, किसान मोर्चाचे जळगाव जिल्हा अध्यक्ष नारायणबापु चौधरी, यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाचे यावल तालुका अध्यक्ष उमेश रेवा फेगडे यांच्या उपस्थित महावितरणच्या अधिकारी यांना निवेदन देण्यात येणार असुन परिसरातील सर्व शेतकरी बांधवांनी जास्त जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.