Home Cities धरणगाव धरणगावात भाजपकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

धरणगावात भाजपकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

0
110


धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, सामाजिक न्यायाचे प्रणेते आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त धरणगाव शहरातील त्यांच्या स्मारकाला माल्यार्पण करून भारतीय जनता पक्षाच्या वतीने अभिवादन करण्यात आले.

या कार्यक्रमात भाजपाचे ज्येष्ठ नेते पी.सी.आबा पाटील, जिल्हा उपाध्यक्ष अ‍ॅड. संजय महाजन, शिरीष आप्पा बयस, कमलेश दादा तिवारी, पुनीलाल आप्पा महाजन, तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील, शहराध्यक्ष दिलीप महाजन, गटनेते कैलास माळी सर, चंदन पाटील, कन्हैया रायपूरकर, गुलाब मराठे, भालचंद्र माळी, मधुकर महाजन, सुनील चौधरी, आनंद वाजपेयी, हितेश पटेल, रावसाहेब पाटील, विशाल महाजन, अ‍ॅड. हर्षल चव्हाण आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या वेळी डॉ. आंबेडकर यांच्या कार्याचे स्मरण करून त्यांच्या विचारांप्रती श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. उपस्थितांनी संविधान मूल्यांचे जतन आणि सामाजिक समतेच्या दिशेने कार्यरत राहण्याचा संकल्प केला. कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले असून, सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देऊन त्यांच्यावरील निष्ठा व्यक्त केली.


Protected Content

Play sound