मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेनेकडून मित्रपक्षांना द्यावयाच्या ९ जागा धरून त्यांना जवळपास १३० जागा सोडण्याची तयारी भाजपने दर्शविल्याचे कळते. मात्र, शिवसेना नेतृत्व मात्र हा आकडा आणखी वाढावा यासाठी प्रयत्नशील आहे. तर दुसरीकडे पितृपक्षानंतरच युतीची घोषणा होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
भाजपच्या दिल्लीतील नेतृत्वाशी संपर्कात असल्याचे खात्रीलायक गोटातून कळते. त्याचवेळी, आज, रविवारी मुंबईत दाखल होणारे भाजप अध्यक्ष अमित शहा हे युतीबाबतचा अंतिम निर्णय जाहीर करण्याची चिन्हे आहेत. राज्यात निवडणुकाची घोषणा झाल्यानंतर युतीची घोषणा अद्याप झालेली नाही. ही घोषणा पितृपक्षानंतर होणार असल्याची माहिती भाजपच्या दिग्गज नेत्यांनी दिली आहे. येत्या 29 सप्टेंबरला घटस्थापना म्हणजेच नवरात्रीचा मुहूर्त साधून युतीची घोषणा होईल, असे भाजपातील अनेक दिग्गज नेते सांगत आहे.