मुंबई (वृत्तसंस्था) मुख्यमंत्रीपद मागता येऊ नये म्हणून शिवसेनेचे खच्चीकरण करण्यासाठी उमेदवार पाडण्यात आले, असा खळबळजनक आरोप शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत संजय राऊत यांनी अनेक गंभीर आरोप भाजपवर लावले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या काळात भाजपा आणि शिवसेना महायुतीत होते. मात्र, भाजपाने शिवसेनेचे खच्चीकरण करण्याचाच प्रयत्न केला, असा दावा राऊत यांनी केला आहे. शिवसेनेच्या जागा भारतीय जनता पक्षाने पाडल्या. हे जगजाहीर आहे आणि कशाप्रकारे पाडल्या हे रेकॉर्डवर आहे. जेव्हा ठरले होते की शिवसेना आणि भाजपाचा मुख्यमंत्री विभागला जाईल. तेव्हाच हे धोरण ठरले होते की, इतके खच्चीकरण करायचे की शिवसेना मुख्यमंत्रीपद मागायच्या परिस्थितीत राहणार नाही, असेही राऊत म्हणाले.