भाजप जिल्हा महानगरतर्फे १ जानेवारी रोजी सीएए समर्थनार्थ स्वाक्षरी मोहीम

bjp

जळगाव, प्रतिनिधी | नव्या वर्षाच्या प्रथम दिवसी म्हणजेच १ जानेवारी २०२० रोजी सीएएच्या समर्थनार्थ भाजप जिल्हा महानगरातर्फे ९ मंडळात मंडळ निहाय राबवणार स्वाक्षरी अभियान जिल्हा अध्यक्ष आ. राजूमामा भोळे यांच्या उपस्थित जिल्हाधिकाऱ्यांना देणार निवेदन देणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृह मंत्री अमित शहा यांनी लोकसभेत व राज्यसभेत पारित झालेल्या संपूर्ण देशभरामध्ये गाजत असलेल्या सीएएच्या समर्थनार्थ संपूर्ण देशभरामध्ये रॅली, निवेदनाद्वारे या धाडसी व ऐतिहासिक निर्णयाचे समर्थन अनेक सामाजिक संघटना व राष्ट्रप्रेमी नागरिकांकडून या विधेयकाचे समर्थन करण्यात येत आहे. नुकतीच भाजप जिल्हा महानगराची महत्वपूर्ण बैठक जिल्हा अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली व तसेच जिल्हा संघटन सरचिटणीस विशाल त्रिपाठी, सरचिटणीस दीपक सूर्यवंशी, उपाध्यक्ष बापू ठाकरे व तसेच दीपक साखरे अजय जोशी, प्रकाश पंडित, व माजी मंडळ अध्यक्ष राजू मराठे, कपील पाटील, प्रदीप रोटे, धीराज सोनवणे, शक्ती महाजन, प्रा. जीवन अत्तरदे, सुशील हसवानी, विनोद मराठे, राहुल वाघ व तसेच नूतन मंडळ अध्यक्ष रमेश जोगी, परेश जगताप, प्रवीण कोळे, केदार देशपांडे, शक्ती महाजन, अजित राणे, संजय लुल्ला,विनोद मराठे, निलेश कुलकर्णी यांच्या उपस्थितीत महत्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीमध्ये, बुधवार १ जानेवारी २०२० रोजी महानगरच्या ९ मंडळांमध्ये सकाळी ९ ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत सीएएच्या समर्थनार्थ नागरिकांच्या स्वाक्षरी अभियान राबवण्याचे ठरविण्यात आले. यानुसार हे अभियान मंडळ क्रमांक १ शिवाजीनगर शिवाजी महाराज पुताळ्याजवळ, मंडळ क्रमांक २ सुभाष चौक येथे, मंडळ क्रमाक ३ कालीन्का माता मंदिर, मंडळ क्रमाक ४ गणेश कॉलनी स्टॉप, मंडळ क्रमाक ५ शिवाजी महाराज चौक पिंप्राळा , मंडळ क्रमाक ६ गिरणा टाकी, मंडळ क्रमाक ७ सिंधी कॉलनी चौक , मंडळ क्रमाक ८ इच्छादेवी मंदिर, मंडळ क्रमाक ९ महाबळ स्टॉप, या ठिकाणी स्वाक्षरी अभियान राबविण्यात येणार आहे. दुपारी १.०० वाजता जिल्हाधिकारी यांना भाजप जिल्हा महानगराचे अध्यक्ष आ. राजूमामा भोळे यांच्या प्रमुख उपस्थित सीएएच्या समर्थनार्थ प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत राबविवेल्या स्वाक्षरी अभियानाचे निवेदन देण्यात येणार आहे असे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख मनोज भांडारकर यांनी कळविले आहे.

Protected Content