जळगाव (प्रतिनिधी) भारतीय जनता पक्षाने २०१४ मधील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्याच यादीत जळगाव जिल्ह्यातील दोन्ही उमेदवारांचे नाव जाहीर केले होते. परंतु २०१९ मध्ये परिस्थिती बदलली आहे. भाजपकडून आज जाहीर झालेल्या २०० उमेदवारांमध्ये आज फक्त जिल्ह्यातील फक्त रावेर मतदार संघात रक्षाताई खडसे यांची उमेदवारी घोषित झालीय. त्यामुळे जळगाव मतदार संघातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता वाढलीय. गत निवडणुकीत अवघ्या राज्यात सर्वाधिक मताधिक्याने निवडून येणाऱ्या खासदार ए.टी.पाटील यांचे नाव का म्हणून पहिल्या यादीत नाही? वरती काही वेगळे राजकारण शिजतेय का? आदी प्रश्नांनी भाजप कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहे.
काही दिवसांपासून जळगाव लोकसभा मतदार संघात ए.टी. पाटील यांच्या जागेवर अन्य उमेदवाराचा पर्यायावर विचार सुरु असल्याची चर्चा सुरु होती. त्यामुळे आज फक्त रावेर मतदारसंघातून रक्षाताई खडसे यांची उमेदवारी जाहीर झाल्याची चर्चा आहे. जळगाव लोकसभेचे विद्यमान खासदार ए.टी. पाटील यांचे नाव पहिल्या यादीत आलेले नाहीय. त्यामुळे त्यांना उमेदवारी दिली जाणार नसल्याची काही दिवसापासून सुरु असलेल्या चर्चेला पुन्हा एकदा उधान आले आहे. काही कथित फोटोंवरून पक्षातीलच काही मंडळीने ए.टी.पाटील यांना उमेदवारी देऊ नये,अशी भूमिका घेतल्याची चर्चा आहे. परंतु भाजप व संघाने केलेल्या सर्वेक्षणात ए.टी.पाटील यांना मतदारांची पसंती असल्याचे म्हटले जात होते. सकारात्मक अहवाल असतांना देखील मग ए.टी.पाटील यांचे नाव पहिल्या यादीत का नाही? असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे.
एकंदरीत जळगाव लोकसभा मतदार संघासाठी उमेदवाराचे नाव पहिल्या यादीत न आल्यामुळे कुठं तरी मुरतंय का? अशी चर्चा आहे. मागील पाच वर्षात असं काय घडलेय की, पहिल्या यादीत नाव असलेल्या खासदारांचे नाव यावेळी पहिल्या यादीत आले नाहीय? त्यामुळे ‘कुछ तो गडबड हैं दया…’ अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झालीय.