भाजपकडून धैर्यशील पाटील यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | भारतीय जनता पक्षाने आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. महाराष्ट्रातून भाजपने धैर्यशील पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शेकापमधून भाजपमध्ये आलेले धैर्यशील पाटील हे रायगड जिल्हयातील मोठे नेते मानले जातात.

महाराष्ट्रात राज्यसभेच्या दोन जागा रिक्त आहे. त्यामुळे दुसरी जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मिळेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. ही दुसरी जागा राष्ट्रवादीला आल्यास अजित पवार यांनी राजकीय सभेमध्ये नितीन पाटील यांना खासदार करतो असा शब्द दिला होता. त्यामुळे नितीन पाटील हे महायुतीचे राज्यसभेचे दूसरे उमेदवार ठरतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Protected Content