शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या ३ जागेसाठी भाजपने जाहीर केले उमेदवार

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपने कोकण पदवीधर, मुंबई पदवीधर आणि मुंबई शिक्षक मतदारसंघातील उमेदवारांची नावे आज जाहीर केली आहेत. भाजपने कोकण पदवीधर मतदारसंघातून निरंजन डावखरे, मुंबई पदवीधर मतदारसंघातून किरण शेलार, मुंबई शिक्षक मतदारसंघातून शिवनाथ दराडे यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे.

निवडणूक आयोगाने पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातून महाराष्ट्र विधान परिषदेच्या द्विवार्षिक निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. या संबंधी 26 जून रोजी मतदान होणार असून 1 जुलै रोजी निकाल जाहीर होणार आहेत. विधान परिषदेच्या 4 आमदारांचा कार्यकाळ या वर्षी 7 जुलै रोजी संपत आहे. त्या जागांवर ही निवडणूक जाहीर करण्यात आली आहे.

Protected Content