जामनेर तालुक्यातील नुकसानग्रस्त गावांना भाजप व प्रहार जनशक्तीच्या पदाधिकाऱ्यांची भेट

जामनेर प्रतिनिधी । तालुक्यात आज झालेल्या जोरदार पावसाने व चक्रीवादळाने ज्या गावांना फटका बसला त्या सर्वच गावांना भारतीय जनता पार्टी व जामनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष साधना महाजन, प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रदीप गायके, ईश्वरलाल जैन, पतसंस्थेचे अध्यक्ष कचरूलाल बोहरा यांनी भेटी दिल्या.

तसेच ओझर गावात ज्यांची पत्रे उडाली होती व घरांची पडझड झाली होती. त्या सर्व घरानां भेटी देऊन सर्वांना दिलासा दिला. शेताच्या बांधावर जाऊन शेतीच्या नुकसानची पाहणी केली. त्याच बरोबर तालुक्याचे प्रशासकीय प्रमुख तहसीलदार अरुण शेवाळे यांनीही लागली. आपली यंत्रणा कामाला लावून पंचनाम्याला सुरुवात केली. ओझर गावातील बऱ्याच घरातील अन्नधान्य भिजल्यामुळे त्यांच्या जेवणाची व्यवस्था कचरूलाल बोहरा यांनी लावली यावेळी चंद्रकांत बाविस्कर, जीतू पाटील, डॉ.प्रशांत भोंडे, महेंद्र बाविस्कर, आतिश झाल्टे, सुहास पाटील, नितीन झाल्टे, रितेश पाटील, दीपक तायडे, रवींद्र झाल्टे, श्रीराम महाजन आदी भाजपाचे तर गणेश महाजन, विकास महाजन, जीवन सपकाळ, मनोजकुमार महाले, बाळू पाटिल, राजू महाजन, नथू चौधरी, साहेबराव खैवाडे, सुरेश महाजन आदि प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

 

 

Protected Content