मुंबई वृत्तसंस्था । मुंबई बंगळूर महामार्गावर झालेल्या विचित्र अपघातात तीन निष्पाप नागरिकांना प्राण गमवावे लागले. डिझेल संपल्यामुळे रस्त्याच्या मधोमध बंद पडलेला ट्रकनंतर डिझेल टाकून सुरू करत असताना ब्रेक फेल झाले आणि हा कंटेनर सत्तरच्या स्पीडने रिव्हर्स गेला आणि हा अपघात झाला असल्याची माहिती समोर आली आहे.
डिझेल संपल्यामुळे एक ट्रक आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास रस्त्यावर बंद पडला होता. त्यानंतर काही वेळाने ड्रायव्हरने डिझेल आणून ट्रक पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला. परंतु यावेळी ट्रकचा ब्रेक फेल झाले आणि हा कंटेनर ताशी ७० च्या वेगाने मागे गेला. मागे जाताना या ट्रकने दोन-तीन वाहनांना धडक दिली. यामध्ये काही दुचाकींचा देखील समावेश आहे. या ट्रक खाली चिरडला गेल्याने तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर चार ते पाच जण जखमी झाले आहेत.