भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । १४ फेब्रुवारी २०१९ रोजी जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथील आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेल्या केंद्रीय राखीव दलातील जवानांना बियाणी मिलिटरी स्कूल मध्ये भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते सर्वप्रथम शहीद जवानांना पुष्पचक्र अर्पण करण्यात आले व मोमबत्ती प्रज्वलित करण्यात आल्या. नंतर रायफल द्रप सह सैनिकी गणवेशात असलेल्या शाळेच्या 900 विद्यार्थी विद्यार्थिनींनी शहीद जवानांना सलामी दिली व ‘शहीद जवान अमर रहे’ असा नारा देण्यात आला.
शाळेचे सैनिकी प्रशिक्षक आर आर बोरसे यांनी आपल्या सैनिकांवर पुलवामा आतंकी हमला कशाप्रकारे झाला व यात किती भारतीय सैनिक मारले गेले याची दुःखद माहिती सांगताना उपस्थिताऺच्या डोळ्यात अश्रू तरडले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मनोज बियाणी,सचिव डॉ.संगीता बियाणी, कार्यकारी संचालक रोनक बियाणी,आयुषी रोनक बियाणी, राजन सर- युको बँक झोनल ऑफिसर नागपूर, शैलेश गुप्ता मॅनेजर युको बँक शाखा भुसावळ, निर्मल कोठारी, सोनू मांडे,राजीव पारिख, प्रवीण भराडीया, गोटू लाहोटी, बियाणी एज्युकेशन ग्रुपच्या विविध संस्थांचे प्राचार्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. वंदे मातरम या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.