Home क्राईम यावल येथे दोघांना विंचवाने घेतला चावा

यावल येथे दोघांना विंचवाने घेतला चावा

0
42

WhatsApp Image 2019 04 30 at 9.56.23 PM

यावल( प्रतिनिधी ) येथील ग्रामीण रुग्णालयात आज दिनांक ३० एप्रील रोजी दोन जणांना विषारी विंचु चावल्याची घटना घडल्या असुन या दोघांवर यावल ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

 

याबाबतचे वृत असे की, यावल येथील आयशा नगरात राहणारी ३५ वर्षीय रुखसार मो. वसीम खाटीक या महीला झोपेत असतांना रात्री २ वाजेच्या सुमारास उजव्या हातास विषारी| विंचवाने चावा घेतल्याने त्यांना मोठ्या वेदना शरीरात होत होत्या. सकाळीच त्यांना यावलच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारा करीता दाखल करण्यात आले होते. यावेळी यावल ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. शबाना तडवी यांनी तात्काळ दक्षता घेवुन रूखसार खाटीक यांच्यावर उपचार केले. तर दुसऱ्या एका घटनेत यावल तालुक्यातील डोंगर कठोरा येथील रहिवाशी प्रशांत रामचंद्र नेहते (वय४६ वर्ष) हे डोंगर कठोरा शिवारातील लक्ष्मण पंढरीनाथ भारंबे यांच्या शेतात सकाळी भुईमुंग तोडणीस गेला असता त्याच्या देखील उजव्या हाताला विषारी विंचु चावल्याने त्यास सकाळी १० वाजताच्या सुमारास त्यांच्या कुटुंबाने उपचारा करीता यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. यावेळी प्रशांत नेहते यांना देखील मोठया वेदना होत असल्याचे त्यांनी सांगीतले, या वेळी चोपडा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. कमलेश जाधव यांनी तात्काळ त्यांचावर औषध उपचार केले, दुपारनंतर दोघ रुग्णानांची प्रकृती सुधारल्याने त्यांना घरी सोडण्यात आले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound