कासोदा, ता. एरंडोल प्रतिनिधी । पारोळ्याचे नगराध्यक्ष करण पवार यांच्या वाढदिवसानिमत्त येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
करण पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा, प्राथमिक जिल्हा परिषद उर्दू शाळा, आश्रम शाळा तसेच हायस्कूल मध्ये विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचा कार्यक्रम पार पडला. यानंतर बिर्ला चौकात हमाल-मापाडी यांना रूमाल व टी-शर्ट देण्यात आले. सार्वजनिक हायस्कूलच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मौलाना आजाद विचार मंचचे जिल्हा संघटक तथा भारतीय पत्रकार महासंघाचे एरंडोल तालुका अध्यक्ष नुरुद्दीन मुल्लाजी होते. याप्रसंगी हायस्कूलचे चेअरमन नरेंद्र पाटील यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की, विद्यार्थ्यांना गणवेश शालेय साहित्याची अडचण येते गरीब गरजू विद्यार्थ्यांची ही अडचण लक्षात घेऊन करण पवार यांनी हा उपक्रम राबविला त्यांना धन्यवाद देऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
अध्यक्षीय भाषणात नुरुद्दीन मुल्लाजी यांनी सांगितले की करण पवार यांनी कोणताही वायफळ खर्च न करता वह्या वाटप व हमाल-मापाडीना रूमाल व टी-शर्ट वाटप करून एक चांगला संदेश दिला आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप बाविस्कर यांनी प्रस्ताविक मुख्याध्यापक टी. डी. वाघ यांनी तर आभार पी. के. पाटील यांनी मानले. याप्रसंगी पारोळ्याचे मोहम्मद पठाण, महंमद खान, आरिफ पेंटर, जलाल शेठ, हमजे खान आदी मान्यवर उपस्थित होते.