पहूर, ता.जामनेर – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । पहूर पेठ येथील ग्रुप ग्रामपंचायत हॉलमध्ये जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज व भगवान परशुराम महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पहूर पेठ येथे महात्मा बसवेश्वर महाराज व भगवान परशुराम महाराज यांच्या जयंती चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्वप्रथम जगतज्योती महात्मा बसवेश्वर व भगवान परशुराम महाराज यांच्या प्रतिमेचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात येऊन द्वीप प्रज्वलित करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री रमेश आप्पा माहोरे हे होते. यावेळी माजी जि .प. कृषी सभापती प्रदीप लोढा, माजी जि. प. सदस्य राजधर पांढरे, सरपंच पती रामेश्वर पाटील, शैलेश पाटील, राजू पाटील सर, माजी पो.पा. विश्वनाथ वानखडे, ज्येष्ठ पत्रकार शांताराम लाठे, पत्रकार मनोज जोशी, आदींनी महात्मा बसवेश्वर व भगवान परशुराम महाराज यांच्या जीवनावर सखोल मार्गदर्शन व त्यांच्या जीवन कार्याचा आपल्या मनोगतातून अभ्यासपूर्ण माहिती सांगितली.
यावेळी पहूर पेठच्या सरपंच निताताई रामेश्वर पाटील, उपसरपंच श्याम सावळे, समाधान पाटील,अँड. संजय पाटील, शरद बेलपत्रे ,दीपक भट, राहुल घरोटे, मोहना जोशी, किरण भट, नागेश साखरे, प्रदीप साखरे, रवींद्र लाठे, मनोज कुयटे, सौरभ बेलपत्रे, मनोज लाठे,शरद पांढरे, ईश्वर देशमुख, ईश्वर बारी, अनिकेत बेलपत्रे, तेजस कुयटे, भरत पाटील ,गणेश मंडलिक, यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच याच कार्यक्रमाचे औचित्य साधून पहूर येथील एम.ए.सि.बी ऑफिसचे कर्मचारी रविंद्र मनोहर जाधव(बाह्योस्तर कर्मचारी) योगेश बेलदार (तंत्रज्ञान) रितेश देशमुख (तंत्रज्ञान) आणि भूषण दराडे( उच्च लिपिक) यांचा उत्कृष्ट कर्मचारी म्हणून पुरस्कार मिळाल्याबद्दल या चारही जणांचा सत्कार यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चेतन रोकडे यांनी तर आभार सरपंचपती रामेश्वर पाटील यांनी मानले.