एरंडोल प्रतिनिधी | तालुक्यातील खडके बु. येथील बालगृहात जळगावातील रेड प्लस रक्तपेढीचे संचालक यांनी आपला वाढदिवस येथील अनाथ, निराधार मुलां-मुलींच्या सोबतीने साजरा केला. .
जळगाव येथील रेड प्लस रक्तपेढीचे संचालक भरत गायकवाड यांचा वाढदिवस खडके बु. येथील बालगृहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने त्यांच्या मित्र परिवारातील सदस्यांनी मुलांशी संवाद साधला व त्यांना मार्गदर्शन केले.
वाढदिवसाच्या निमित्ताने संस्थेतील मुलींनी स्वागतगीत, शुभेच्छासाठी गीत गायिले. औक्षण करुन शुभेच्छा दिल्या. यावेळी संस्थेतील बालकांना भरीत पुरी, जिलेबीचे मिष्ठान्न भोजन देण्यात आले. बालगृहातील आनंदित वातावरण पाहून या बालकांसाठी आणखी मदत करण्याची इच्छा व्यक्त केली आणि संस्थेला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
अधिक्षक मधुकर कपाटे यांनी संस्थांतील मुलासाठी रक्त तपासणी शिबिर आयोजित करण्याविषयी सुचविले असता लवकरच आयोजन करू असे आश्वासन दिले. वाढदिवसासाठी दिपक सपकाळे, विश्व हिंदु परिषद जळगाव जिल्हाध्यक्ष दिपक दाभाडे, बाळासाहेब गव्हाणे, जीवनज्योती रक्तपेढीचे अमोल शेलार, जावेदभाई, सुकलाल सुरवाडे आदींची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाप्रसंगी संस्थाचालक प्रभाकर पाटील यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व वाढदिवस संस्थेत साजरा केल्यामुळे भरत गायकवाड यांचे आभार मानले. कार्यक्रमासाठी अधिक्षक मधुकर कपाटे, प्रमोद पाटील, तुषार अहिरे, गणेश पंडीत, ज्ञानेश्वर पाटील, हेमंत पाटील, अरूणा पंडीत, रेखाबाई देशमुख यांनी परिश्रम घेतले.