केसीईच्या आयएमआर महाविद्यालयात युवती सभेचे उद्घाटन

जळगाव प्रतिनिधी । केसीई संचलित आयएमआर महाविद्यालयात शुक्रवारी युवती सभेचे उद्घाटना प्रा. डॉ शुभदा कुळकर्णी याच्याहस्ते करण्यात आले.

प्रा.डॉ. शुभदा कुळकर्णी म्हणाले की, व्यक्तिमत्त्व विकास हा उपजत असणे आणि जाणिवपूर्वक घडवणे या दोन्हीचा सुयोग्य संगम झाला की मेरी कोम सारखे व्यक्तीमत्व उभे राहाते. एक नूर आदमी आणि दस नुर कपडा इथुनच आपली सुरवात होते. कारण आपल्याला उत्तम दिसायचे असते. उत्तम राहायचे असते, स्वतःला छान प्रेझेंट करायचे असते, आपले मुलगी शिकली प्रगती झाली हि स्लोगन म्हणून ठिक आहे. पण शिकणे म्हणजे फक्त मार्कशीट अपडेट झाली असे होत नाही.

आपली फिझीकल हेल्थ तुम्ही मेन्टेन केली पाहिजे. त्याच बरोबरीनेच आपली मेंटल हेल्थ पण उत्तम पाहिजे.. म्हणुनच आज योगा हा विषय तुमच्या अभ्यासक्रमातही आला आहे. फक्त भारतालाच नाही तर जगाला या योगाचे महत्त्व पटले आहे. फिट अ़ॅन्ड फाईन आजच्या जगाच्या मंत्र आहे.. तुमच्या खाण्याच्या सवयी, तुमच्या झोपेच्या सवयी या तुमच्या व्यक्तिमत्त्वावर परीणाम करतात.. म्हणूनच आम्हाला आमची टाईम मॅनेजमेंट खुप व्यवस्थित मेन्टेन केली पाहिजे. पहाटे तुम्ही खेळायला सुरुवात केली तर..तर त्यांचा तुमच्या व्यक्तिमत्त्वात सकारात्मक फरक तुम्हाला जाणवतो..रोम इज नॉ बिल्ट ईन अ डे…एक दिवसात काही उभे राहातं नाही. त्यासाठी प्रयत्नपुर्वक घडवुन आणावे लागते.. मित्र-मैत्रिणी जाणिवपूर्वक निवडलीत तर तुमचे करीयर गोल आताच सेट होतीलच..कामाच्या ठिकाणी चांगली रिलेशनशिप ही सुद्धा हि सुद्धा आवश्यक गोष्ट आहे..त्यासाठी आपण आपले संभाषण कौशल्य वाढवले पाहिजे.. जे पुर्वग्रहदुषित नको.. तुमच्या आजूबाजूला नाना विवीध संस्कृतीचे लोक असतीलच पण टिम बिल्डींग करायचे असेल तर काही गोष्टी जाणिवपूर्वक करा असे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ शमा सराफ यांनी केले. ओळख प्रा. साधना थत्ते यांनी करुन दिली तर कार्यक्रमाची प्रस्तावना प्रा. तनुजा फेगडे यांनी केली. आयएमआरच्या डायरेक्टर प्रा. डॉ शिल्पा बेंडाळे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. अनुपमा चौधरी यांचे सहकार्य लाभले

Protected Content