मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | देशातील ज्येष्ठ रेडिओ होस्ट अमीन सयानी यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी निधन झाले. मंगळवारी सायंकाळी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले. त्यांना एचएन रिलायन्स रुग्णालयात नेण्यात आले, तेथे सायंकाळी ७ वाजता त्यांचा मृत्यू झाला. सयानी १९५२ ते १९९४ दरम्यान गीतमाला रेडिओ शोचे होस्ट होते. यामुळे त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती.
अमीन सयानी हे प्रदीर्घ काळापासून आरोग्याच्या समस्यांनी त्रस्त होते. त्यांना मागील १२ वर्षांपासून पाठदुखीचा त्रास होता आणि त्यामुळेच त्यांना चालण्यासाठी वॉकरचा वापर करावा लागत होता.ज्यांना रेडिओचे जग माहित आहे, त्यांना अमीन सयानी कोण होते हे देखील माहित आहे. ‘बिनाका गीतमाला’च्या या उद्घोषकाला रेडिओचे श्रोते अजूनही विसरलेले नाहीत. ते अतिशय उत्साही आणि सुरेल पद्धतीने ‘बहनों और भाइयो’म्हणायचे. आज त्यांनी जगाचा निरोप घेतला, त्यांच्या निधनाच्या बातमीने त्यांच्या आवाजाचे चाहते दु:खी झाले आहेत.
अमीन सयानी यांच्या निधनाच्या वृत्ताने त्यांच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. अमीन सयानी यांचा मुलगा राजील सयानी याने वडिलांच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे. त्यांनी सांगितले की, मंगळवारी (20 फेब्रुवारी) त्यांच्या वडिलांना दक्षिण मुंबईतील त्यांच्या घरी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना तातडीने जवळच्या एच.एन. रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. तरी उपचारानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.