आ. शिरीष चौधरी यांच्याहस्ते भूमिपुजन व लोकार्पण

सावदा, ता. रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत मंजूर असलेल्या कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा पार पडला.

आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या निधी अंतर्गत १) मौजे अकलुद, ता. यावल येथील माध्यमिक शाळेच्या परिसरात टूबवेल करणे. २.५ लक्ष व गेट कमान पासून ते राजू गिरधर कोळी यांच्या घरापर्यंत कॉंक्रिटीकरण – ५ लक्ष, २) मौजे कठोरा प्र सावदा, ता. यावल येथे स्मशानभूमी कडे जाणारा रस्ता कॉंक्रिटीकरण – ४ लक्ष, ३) मौजे कासवा, ता. यावल येथे जनार्धन कोळी सपकाळे ते दुर्गा देवी मंदिरापर्यंत कॉंक्रिटीकरण – ३ लक्ष, ४) मौजे दूसखेडा, ता. यावल येथे स्मशानभूमी कडे जाणारा रस्ता कॉंक्रिटीकरण – ५ लक्ष या विकास कामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा संपन्न झाला.

याप्रसंगी सोबत माजी पंचायत समिती सभापती लिलाधर चौधरी, विलास तायडे, जितेंद्र सपकाळे, धनंजय चौधरी, अकलुद-कठोरा-कासवा ग्रुप ग्रामपंचायत सरपंच राहुल इंगळे दुसखेडा सरपंच योगेश वसंत सोनवणे, विकास सपकाळे, संदीपभैय्या सोनवणे, आनंद सपकाळे, मारुळ सरपंच असद सैय्यद, अशोक पाटील, मंगाशेठ सोनवणे प्रवीण सोनवणे दत्तू पाटील कासवा येथील समाधान सपकाळे, लोहित सपकाळे, संदीप तायडे, लक्ष्मण तायडे जितेंद्र सपकाळे श्रीराम सपकाळे सोनू सपकाळे, किशोर तायडे व अकलुद कठोरा कासवा दुसखेडा येथील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

Protected Content