Home Cities जळगाव शासकीय कर्मचाऱ्यांची दुचाकी लांबविली

शासकीय कर्मचाऱ्यांची दुचाकी लांबविली

0
32

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पार्कींग येथून कर्मचाऱ्याची १० हजार रूपये किंमतीची दुचाकी लांबविल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी बुधवार २८ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, रविंद्र अर्जून चौधरी (वय-४६) रा. रायसोनी नगर, जळगाव हे सार्वजनिक बांधकाम विभागात नोकरीला आहे. मंगळवार २७ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता रविंद्र चौधरी हे दुचाकी (एमएच १९ एक्यू ३०९३)ने कामावर आले. त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पार्कींगमध्ये त्यांची दुचाकी पार्क करून लावली. अज्ञात चोरट्याने त्यांची १० हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेल्याचे दुपारी १ वाजता उघडकीला आले. रविंद्र चौधरी यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक भरत चव्हाण करीत आहे.


Protected Content

Play sound