अशोक गेहलोत कॉंग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर !

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राजस्थानेच मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आपण कॉंग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढविणार नसल्याची महत्वाची घोषणा आज केली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढविणार असल्याची चर्चा सुरू होती. तथापि, यात अनेकदा संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. विशेष करून जर गेहलोत हे कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष बनले तर त्यांना राजस्थानचे मुख्यमंत्रीपद सोडावे लागेल असे श्रेष्ठींनी सांगितले. यामुळे गेहलोत समर्थकांनी आक्रमक पवित्रा घेतला. पक्षाच्या ९२ आमदारांनी राजीनाम्याची तयारी दर्शविली. या सर्वांना गेहलोत यांचा राजीनामा आणि नंतर सचिन पायलट यांच्या संभाव्य मुख्यमंत्रीपदाला विरोध होता.

या पार्श्‍वभूमिवर, आज अशोक गेहलोत यांनी दिल्लीत सोनिया गांधी यांची भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलतांना आपण अध्यक्षपदाची निवडणूक लढविणार नसल्याची घोषणा केली. यामुळे आता नेमकी कोण निवडणूक लढविणार आणि कुणाच्यात सामना होणार याबाबत उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Protected Content