भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी| अडावद-उनपदेव रस्त्यावर भरधाव अज्ञात ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने अमोल संजय महाजन (१८) या युवकाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात १५ रोजी रात्री ८:१५ च्या सुमारास प्रमिला नगर जवळ घडला.

अमोल महाजन हा शेतातून अडावदकडे दुचाकीवरून परतत असताना समोरून येणाऱ्या अज्ञात चारचाकी वाहनाने त्याला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात तो जागीच ठार झाला.

अपघातानंतर अमोलला तातडीने अडावद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र, तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन सुशीर यांनी त्याला मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच अडावद पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, हवालदार भरत नाईक आणि शुभम बाविस्कर यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस अज्ञात चारचाकी वाहनाचा शोध घेत असून पुढील तपास सुरू आहे.

Protected Content