जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील अजिंठा चौकात चोरीची दुचाकी घेऊन फिरणाऱ्या संशयित आरोपीला एमआयडीसी पोलिसांनी मंगळवारी २६ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता अटक केली असून त्याच्या ताब्यातून चोरीची दुचाकी हस्तगत केली असून पुढील कारवाईसाठी शहर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
याबाबत माहिती अशी की, ‘एमआयडीसी पोलीस स्थानकातील शोध पथकातील पोलिस नाईक किशोर पाटील व पोलीस कॉन्स्टेबल मुकेश पाटील हे मंगळवार २६ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता अजिंठा चौकात पेट्रोलिंग करत असताना संशयित आरोपी ज्ञानेश्वर शिवाजी पाटील (वय-२५) रा. गोहरी ता.जामनेर ह. मु. कमल पॅराडाईज मंगल कार्यालय, जळगाव हा दुचाकी घेऊन संशयास्पद हालचाल करत असतांना आढळून आला.
यावेळी पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांच्याकडे चोरीची दुचाकी आढळून आली. ही दुचाकी चोरीबाबत जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी पोलीसांनी संशयित आरोपी ज्ञानेश्वर पाटील याला पुढील कारवाईसाठी शहर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
यांनी केली कारवाई –
पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा, एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील, अतुल वंजारी, पोलीस नाईक किशोर पाटील, चेतन पाटील, गणेश शिरसाळे, मुकेश पाटील यांनी कारवाई केली.