जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव, अमळनेर, भुसावळ परिसरातून चोरी केलेल्या सात दुचाकींसह तीन संशयित चोरट्यांना भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी अटक केल्याची कारवाई केली आहे. तिघांकडून ७ दुचाकी अस्तगत करण्यात आल्या आहेत.
जळगाव भुसावळ आणि अमळनेर शहरातून दुचाकी चोरी करून संशयित आरोपी भुसावळ शहरात फिरत असल्याची गोपनीय माहिती भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी गुन्हे शोध पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान पोलीस पथकाने शुक्रवार २० ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता भुसावळ शहरात कारवाई करत संशयित आरोपी सैय्यद शहारुख सैय्यद रहेमान (वय-२९, रा. पंचशिल नगर भुसावळ) याला अटक केली. त्याची कसून चौकशी केली असता त्यांनी दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली असून या दुचाकी अमळनेर, जळगाव आणि भुसावळ शहरातून चोरी केल्याचे सांगितले ही चोरी त्याचे साथीदार दानिश उर्फ गोलू शरीफ खान (वय-२४ रा. दिन दयाल नगर, भुसावळ), आणि कामीलोद्दीन अजीजउद्दीन (वय-३०, रा. फैजपुर ता. यावल) यांच्यासोबत केल्याचे सांगितले त्यानुसार पोलिसांनी दोघांनाही देखील अटक केली आहे. तिघांकडून चोरीच्या ७ दुचाकी हस्तगत करण्यात आले आहे. तिघांवर भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीनही संशय आरोपींना न्यायालयात हजर केले असता ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलीस अधिक्षक एम.राजकुमार, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधीकारी कृष्णात पिंगळे आणि पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि हरीष भोये, पोउनि मंगेश जाधव, पोहेकॉ विजय नेरकर, सुनील जोशी, रमण सुरळकर, उमाकांत पाटील, निलेश चौधरी, यासीन पिंजारी, महेश चौधरी, प्रशांत परदेशी, योगेश माळी, सचीन चौधरी अश्यांनी केली. पुढील तपास पोहेकॉ विजय बळिराम नेरकर हे करत आहेत.