भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ ते वरणगाव दरम्यान असलेल्या वांजोळा गावाच्या रोडवर महामार्ग ओलांडत असतांना तरूणाच्या दुचाकीला भरधाव वेगाने येणाऱ्या ट्राला वाहनाने जोरदार धडक दिल्याने गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी ३ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली आहे. जखमी तरूणाला भुसावळ येथील ट्रामा केअर सेंटर येथे दाखल करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, यावल तालुक्यातील रिधोरी येथील तरूण राजू सपकाळे वय ३० हा त्यांच्या दुचाकी क्रमांक (एमएच १९ बीपी ७५४५) ने वरणगावकडून जळगाव दिशेने जात होता. त्यावेळी वांजोळा रोडवर जाण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ हा ओलांडत असतांना १२ चाकी ट्राला क्रमांक (जीजे १९ वाय १४०७) ने धडक दिली. या अपघात राजू सपकाळे हा तरूण गंभीर जखमी झाला आहे. अपघात घडल्यानंतर ट्रालावरील चालक हा वाहन सोडून पसार झाला. जखमी झालेल्या तरूणाला रूग्णवाहिकेतून भुसावळ येथील ट्रामा केअर सेंटर येथे दाखल करण्यात आले.
दरम्यान, याच ठिकाण यापुर्वी १० अपघात झाले आहे. यात ४ जणांचा मृत्यू झाला. हा महामार्ग बनवितांना महामार्ग प्रशासनाने अंडपास काढला नसल्याने हे आपघात होत आहे. सातत्याने होत असल्याने या ठिकाणी अंडरपास काढण्यात यावा अशी मागणी खासदार रक्षा खडसे, आ. संजय सावकारे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन देण्यात आलेले आहे. परंतू अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. यामुळे येथील ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.