Home क्राईम दोन दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी

दोन दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील माहेजीकडून बोरनारकडे येत असतांना बोरनार गावाजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात दुचाकीच्या धडकेत ५२ वर्षीय दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी ५ मे रोजी सायंकाळी ५ वाजता घडली होती. याप्रकरणी चौकशी अंती अखेर शनिवारी ११ मे रोजी रात्री ११.३० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनिल काशीनाथ मराठे वय ५२ रा. बोरनार ता.जि.जळगाव असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सुनिल मराठे हे आपल्या कुटुंबासह बोरनार येथे वास्तव्याला आहे. रविवारी ५ मे रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास ते माहिजी येथून बोरनार येथे येण्यासाठी दुचाकी क्रमांक एमएच १९ एडी ५४१७ ने निघाले होते. त्यावेळी बोरनार गावाजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात दुचाकीने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत सुनिल मराठे हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. ही घटना घडल्यानंतर अज्ञात दुचाकीस्वार फरार झाला. याप्रकरणी अखेर शनीवारी ११ मे रोजी रात्री ११.३० वाजता एमआयडीसी पोलीसात फिर्याद दिली. त्यानुसार पोलीसात अज्ञात दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ स्वप्निल पाटील हे करीत आहे.


Protected Content

Play sound