भरधाव बसच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी

अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील अमळगाव शहरानजीक असलेल्या शेताजवळ भरधाव बसच्या धडकेत दुचाकीधारक जखमी झाल्याची घटना शनिवारी २८ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता घडली आहे. याप्रकरणी रविवारी २९ डिसेंबर रोजी पहाटे ४ वाजता मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शालीग्राम मन्साराम पाटील रा. मुदंडा नगर, अमळनेर असे जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.

अधिक माहिती अशी की, अमळनेर शहरातील मुदंडा नगरात राहणारे शालीग्राम मन्साराम पाटील हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शनिवारी २८ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता दुचाकी (क्रमांक एमएच १९ डीपी ३०८०) ने जळोद फाट्याजवळून जात असतांना समोरून येणारी भरधाव बस क्रमांक (एमएच २० बीएल ०९३४) ने जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील शालीग्राम पाटील हे गंभीर जखमी झाले. त्यांना अमळनेर येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी रविवारी २९ डिसेंबर रोजी पहाटे २ वाजता मारवड पोलीस ठाण्यात बसवरील अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सचिन निकम हे करीत आहे.

Protected Content