जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील मैत्रीय हॉटेल समोरील चौकातील महामार्गावरील भरधाव वेगाने येणाऱ्या मालवाहू टेम्पो वाहनाने जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवार ८ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी गुरूवार ९ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेली माहिती अशी की, मिर्झा वसीम बेग मोहमुद बेग (वय-४०) रा. सुप्रिम कॉलनी, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. ते ॲग्लो हायस्कूल येथे नोकरीला आहे. बुधवार ८ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता ते दुचाकी (एमएच १९ सीबी ४१८६) ने घरी जाण्यासाठी निघाले. शहरातील मैत्रेय हॉटेल समोरून दुचाकीने जात असतांना समोरून मालवाहू टेम्पो क्रमांक (एमएच १९ सीवाय ४०० ) ने जोरदार धडक दिली. या धडकेत मिर्झा वसील बेग हे जखमी होवून पायाला गंभीर दुखापत झाली आहे. तसेच दुचाकीचेही मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी गुरूवारी ९ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार वाहनावरील अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय पाटील करीत आहे.