जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । नेहरू पुतळा जवळून दुचाकीने नवीपेठकडे जाणाऱ्या रस्त्यावर मागून भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीस्वाराने २३ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार रमेश दशरथ सोनवणे (रा. मयूर कॉलनी, पिंप्राळा) हे गंभीर जखमी झाले. याप्रकरणी शुक्रवार १७ मे रोजी दुपारी १.३० वाजता धडक देणाऱ्या तरुणाविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरातील मयुर कॉलनीत रमेश सोनवणे हे वास्तव्यास आहे. २३ एप्रिल रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास ते त्यांच्याकडील (एमएच १९, ईबी ६९६४) क्रमांकाच्या दुचाकीने नेहरु पुतळ्याकडून टॉवर चौकाकडे जाणाऱ्या रस्यावर मागून भरधाव वेगाने येणाऱ्या (एमएच १९, डीएक्स ८८१५) क्रमांकाच्या दुचाकीवरस्वार तरुणाने जोरदार धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार रमेश सोनवणे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर रमेश सोनवणे यांच्या पत्नी मनिषा सोनवणे यांनी शहर पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार शुक्रवारी १७ मे रोजी दुपारी १.३० वाजता धडक देणाऱ्या दुचाकीस्वार रोहीत सुनिल खैरनार रा. भिकमचंद जैन नगर , जळगाव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ दिलीप पाटील हे करीत आहे.