कारला मागून धडक दिल्याने दुचाकीस्वार जखमी

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील दहिवद गावाच्या फाट्याजवळ पुढे जाणाऱ्या कारला मागून धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी ११ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता घडली आहे. याप्रकरणी रात्री ९ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात दुचाकी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी की, योगेंद्र राजेंद्र चौधरी वय-३६, रा. तेलीवाडा, चोपडा हे कामाच्या निमित्ताने आपल्या सोमवारी ११ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता त्यांच्या कारचालकासह अमळनेर कडून चोपडाकडे दहिवद फाट्याजवळून कार क्रमांक (एमएच ०५ इझेड ७११७) ने जात होते. त्यावेळी त्यांच्या मागून येणारी दुचाकी क्रमांक (एमएच १८ सीबी २८२४) येणाऱ्या दुचाकी चालक ज्ञानेश्वर सदाशिव चौधरी रा. शिरूड ता.धुळे याने जोरदार धडक देऊन स्वतःच्या दुखापतीस कारणीभूत ठरला. त्यामुळे याप्रकरणी योगेंद्र चौधरी यांनी अमळनेर पोलिसात तक्रार दिली त्यानुसार दुचाकीस्वार ज्ञानेश्वर चौधरी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पो.काँ विजय भोई हे करीत आहे.

Protected Content