भुसावळ प्रतिनिधी । शहरात राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त अनुश्री महिला बहुउद्देशिय संस्थेतर्फ डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानापासुन ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळयापर्यंत प्रथमच मुलिन्नी बाईक रॅली काढण्यात आली होती.
यावेळी ममता पाटील, स्मिता चौधरी, नगरसेविका सविता मकासरे, सीएलएफचे वंदना शंखपाल आर्य फाउंडेशनच्या डॉ. वंदना वाघाचौरे, कोटेजा महाविद्यालयाचे प्रा पाटिल, अनुश्री बहुद्देशिय संस्थाच्या अध्यक्ष जयश्री इंगळे, उपाध्याय वंदना जोगदंड, सचीव शिला लहाने
उपस्थित होते. रॅली डॉ बाबासाहेब आंबेडकर मैदान हून निघून बाजारपेठ मार्ग हून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ संपली. रॅलीत सर्व महिलांनी भगवे फेटे बांधले होते.