जळगाव प्रतिनिधी । शहरातील हरिविठ्ठल नगरातील घराच्या बाहेर लावलेली मोटारसायकल 13 ऑगस्ट रोजीच्या मध्यरात्री चोरट्यांनी लांबवून नेल्याची घटना उघडकीस आली. याबाबत रामानंद नगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत महिती अशी की, बिस्मीला चौकातील रहिवाशी मजीद इकबाल तडवी यांचा रेडीमेट कपडे व कटलरी विक्रीचा व्यवसाय आहे. मागच्या वर्षीच मजीद तडवी यांनी एमएच १९ एएजे ९६५८ ही मोटारसायकल जुनी वापरती विकत होती. दि.१३ रोजी रात्री तडवी यांच्या घराच्या बाहेर लावलेली मोटारसायकल चोरट्यांनी लांबवून नेली. तडवी यांनी सर्वत्र शोध घेतल्यानंतर याप्रकरणी गुरुवारी दुपारी रामानंद नगर पोलीसात मोटारसायकल चोरीप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला.